कबड्डी हा मुख्यत्वे महाराष्ट्रातील तांबडया मातीतला खेळ. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात ७ खेळाडू असतात. हा खेळ सांघिक खेळ असून या खेळाची खास बात म्हणजे खेळादरम्यान आऊट झालेला खेळाडू परत जिवंत होऊन संघामध्ये सामील होऊ शकतो.
हा खेळ एवढा चांगला असूनही याला म्हणावी तशी पब्लिसिटी मिळाली नव्हती. नेमकं हेच काम प्रो कबड्डी लीग ने करून दाखवलं आणि हा खेळ स्टार च्या वाहिनीने भारतातल्या घराघरांत पोहोचवला. यावर्षी त्याचा पहिलाच सीजन चालू असून त्यात सध्या ८ संघ असून महाराष्ट्रातील २ संघ आहेत. हे लीग आता अल्पावधीतच विलक्षण लोकप्रिय झाले आहे व दिवसेंदिवस हे लीग पाहणार्यांची संख्या वाढतच आहे. हे सर्व बघता कबड्डी ला सुगीचे दिवस आले असं म्हणण्यास वावगं ठरु नये. अर्थात याचे श्रेय सर्व गुणी खेळाडू, कोचेस, लीग आणि स्टार वाहिनीची सर्व टीम यांना द्यायलाच हवे.